आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sari Clad Vidya Balan Beats HOT Malaika Arora In A Backless, Candid Avatar At IIFM Event

IIFM event: विद्याच्या साडी लूक पुढे मलायकाचे ग्लॅमर पडले फिके, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्या बालन बॉलिवूडच्या अशा अत्रिनेत्रींमध्ये सामील आहे, ज्यांनी आपल्या 'अँटी इमेज'ला अभिनयच्या जगात एक वेगळी ओळख करून दिली आहे. तिचा अलीकडेच रिलीज झालेल्या 'शादी के साइड इफेक्ट्स' सिनेमामधील तिच्या भूमिकेची बरिच प्रशंसा केली जात आहे. विद्यासाठी 2014ची चांगली सुरूवात झाली आहे असेच म्हणावे लागेल. उत्कृष्ट अभिनयाबरोबरच तिचा साडी लूक ही तिची दुसरी ओळख आहे. कारण अधिकतर कार्यक्रमांमध्ये ती साडीमध्ये परिधान करूनच उपस्थिती लावते.
'शादी के साइड इफेक्ट्स'च्या यशानंतर ती मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या इंडिअन फिल्म फेस्टिव्हल मेलबर्न(IFFM)मध्ये पोहोचली होती. तिच्यासोबत सिनेमा निर्माता राकेश ओमप्रकाश मेहरा, राजकुमार हिरानी आणि बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री सिमी ग्रेवालसुध्दा दिसली. विद्याचा सिनेमा रिलीज झाल्याने सध्या तिच्याकडे बराच फावला वेळ आहे. तिने या कार्यक्रमाला खूप एन्जॉय केले.
कार्यक्रमात विद्या साडी लूकमध्ये दिसली. तिने हाईनेक ब्लाऊजसोबत फिकी सिल्वर रंगाची साडी नेसलेली होती. साडीचे काठ पिवळ्या रंगाचे होते. विद्याला IFFM(इंडिअन फिल्म फेस्टिव्हल)ची ब्राँड अ‍ॅम्बेसेडर बनवले आहे. तिच्यासोबत या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा खानसुध्दा उपस्थित होती. मलायकाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला होता. परंतु तिचा ग्लॅमर लूक विद्याच्या साडी लूक पुढे फिका पडला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा IFFMमध्ये विद्या बालनची काही खास छायाचित्रे...