आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satyagraha Trailer Launch: Kareena Kapoor, Ajay Devgn Join Amitabh Bachchan From London

'सत्याग्रह'चा ट्रेलर लाँच, तयार झाला वेगळ्या धाटणीचा सिनेमा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


यावर्षीचा बहुप्रतिक्षित 'सत्याग्रह - डेमोक्रेसी अंडर फायर' हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात लाँच करण्यात आला. या सिनेमात अमिताभ बच्चन, अजय देवगण, करीना कपूर, मनोज बाजपेयी आणि अमृता अरोरा मुख्य भूमिकेत आहेत.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला सगळे स्टार्स हजर होते. दिग्दर्शक प्रकाश झा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर कार्यक्रमाला आले होते. तर अजय देवगण आणि करीना कपूर लंडनहून व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मनोज बाजपेयी, अमृता रावसुद्धा या कार्यक्रमात दिसले. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन त्यांच्या नेहमीच्या गेटअपमध्ये अर्थातच कुर्ता आणि शॉलमध्ये दिसले.

हा सिनेमा अण्णा हजारेंच्या आंदोलनावर आधारित असल्याची चर्चा होती. मात्र या कार्यक्रमात प्रकाश झांनी स्पष्ट केले की, 'सत्याग्रह' हा सिनेमा अण्णा हजारेंच्या आंदोलनावर आधारित नाहीये.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा या कार्यक्रमाची खास झलक..