आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SCREEN AWARDSमध्ये स्टार्सच्या परफॉर्मन्सची धूम, जया-रेखाच्या रंगल्या गप्पा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन वर्षाची सुरुवात होताच बॉलिवूडकरांचे वेध लागतात ते अवॉर्ड फंक्शन्सकडे. 2014 या नवीन वर्षाची सुरुवातीला रंगलेला पहिला अवॉर्ड सोहळा म्हणजे स्क्रिन अवॉर्ड. पंजाबी सिंगर हनी सिंहने आपल्या हिट गाण्यांनी सोहळ्यात रंग भरले तर फ्लोरोसेंट लहेंग्यात सजलेल्या दीपिका पदुकोणने 2013 या वर्षातील हिट डान्स नंबर्सवर परफॉर्म केले. 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणा-या वरुण धवननेसुद्धा आपल्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली.
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा शो होस्ट करताना दिसला. त्याला साथ दिली 'रामलीला' फेम रणवीर सिंहने. या कार्यक्रमात बच्चन, सिन्हा आणि अख्तर कुटुंबीय उपस्थित होते.
अमिताभ, जया आणि अभिषेक कार्यक्रमाची मजा लुटताना दिसले. मात्र बच्चन बहू ऐश्वर्या यावेळी दिसली नाही.
याशिवाय एव्हरग्रीन रेखाने आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाला चारचाँद लावले. रेखा आणि जया योगायोगाने लाल रंगाच्या साडीत दिसल्या. यावेळी दोघीही चक्क एकमेकींची विचारपुस करताना दिसल्या.
जावेद अख्तर यांनी पत्नी शबाना, मुलगा फरहान आणि सून अधुनासह अवॉर्ड शोची मजा लुटली. तर सोनाक्षी सिन्हा वडील शत्रुघ्न आणि भाऊ लवसह कार्यक्रमात आली होती.
महानायक अमिताभ बच्चन यांना हिंदी सिनेसृष्टीतील मोलाच्या योगदानासाठी लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते अमिताभ यांना हा पुरस्कार देण्यात आला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा या सेरेमनीची खास छायाचित्रे...