आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्‍वत: ला विकणे अयोग्य : अभिनेता सनी देओल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ नवी दिल्ली - सध्या बॉलिवूडमधील स्टार्समध्ये मार्केटिंगच्या नावावर स्वत:ला विकण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे दिसते. ही बाब अभिनयातील रांगडा परिवार मानल्या जाणा-या देओल्सना अजिबात मान्य नाही. अभिनेत्याने स्वत:ला विकणे योग्य नाही. आम्ही स्वत:ला विकू शकत नाहीत, असे धर्मेंद्रपुत्र सनी देओल म्हणतो.


बॉलिवूडमधील अनेक नामीगिरामी कलाकार मंडळींना लाइमलाइटमध्ये राहायला आवडते. परंतु देओल कुटुंबाने चित्रपटसृष्टीत राहून खासगी आयुष्य गुप्त ठेवल्याचे दिसते. आत्मसन्मान ही गोष्ट आम्हाला आवडते. आम्ही जे आहोत, ते सोडणार नाही. म्हणूनच स्वत:ला विकणे आम्हाला मान्य नाही. सध्या लोकांना खासगी गोष्टींची वाच्यता करणे गैर वाटत नाही. कदाचित ही संस्कृती असेल. परंतु आम्ही त्या मार्गाने जाणार नाही, असे सनीने एका मुलाखतीत स्पष्ट केले. कामाविषयी एक गोष्ट महत्त्वाची वाटते. परिश्रमात सातत्य ठेवले पाहिजे. विश्वास ढळू देऊ नये. तुमचे दैव तुम्हाला कधी भेटेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे कधीही संधी तुमच्या वाट्याला येऊ शकते, असे त्याने आवर्जून सांगितले.


56 वर्षांचा जट !

सनी देओलचा ताजा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचे एवढे वय असेल असे वाटत नाही. एवढी त्याची बॉडी मेंटेन आहे. 1983 मध्ये ‘बेताब’मध्ये अमृता सिंगसोबत रुपेरी पडद्यावर आलेला सनी लवकरच अ‍ॅक्शन हीरो म्हणून प्रस्थापित झाला.


100 कोटी..त्यात काय?

बॉलिवूडमध्ये 100 कोटींचे उत्पन्न नवीन नाही. पूर्वीही अनेक चित्रपटांनी 100 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळवले आहे. अनेक वर्षे एवढी कमाई झाली होती. आता केवळ ही गोष्ट अधिक स्पष्टपणे मांडली जात आहे, असे सनीला वाटते.