बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल ब-याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर दिसली नाही. मात्र प्रसिद्धीझोतात राहण्याची एकही संधी तिने सोडली नाही. अलीकडेच अमिषाने एक बोल्ड फोटोशूट करुन सगळ्यांना आश्चर्यचकित केले, अमिषाने हे फोटोशूट 'मॅक्सिम' या प्रसिद्ध मॅगझिनसाठी केले आहे. या फोटोशूटमध्ये अमिषाने बेडवर हॉट पोज दिले आहेत. साहजिकच अमिषाचे हे फोटोशूट तिच्या चाहत्यांना एका ट्रीटपेक्षा कमी नाही.
अमिषाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आगामी 'रेस 2' या सिनेमात अमिषा झळकणार आहे. सध्या या सिनेमाचे शुटिंग तुर्कीमध्ये सुरु आहे. या सिनेमात अमिषाबरोबर दीपिका पदुकोण, जॅकलिन फर्नांडिस, सैफ अली खान, जॉन अब्राहम हे कलाकारसुद्धा दिसणार आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा अमिषाचे बेडरुममधील खास फोटोशूट...