आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅकिंगच्या जाळ्यात अडकली पूनम पांडे, वेबसाइट झाली हॅक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टि्वटवर हॉट व्हिडिओ आणि छायाचित्रे पोस्ट करून चर्चेत राहणारी पूनम पांडे नेहमीच वादाच्या भोव-यात असते. पूनम पुन्हा एकदा सोशल नेटवर्किंगच्या प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. सतत सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहणा-या पूनम पांडेचे ऑफिशिअल टि्वटर अकाउंट हॅक झाले आहे. सतत चाहत्यांना मसालेदार बातम्या देणारी आणि खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर कराणारी पूनम आज स्वत: इतक्या मोठ्या संकटात सापडली आहे. तिच्या वेबसाइडवर हॅकरने 'पाकिस्तान झिंदाबादचा आणि काश्मिरला न्याय मिळावा असा नारा लावला आहे.' त्यानंतर हा प्रकार बघून घाबरलेल्या पूनमने तिच्या फॉलोअर्सला टि्वटरच्या माध्यमातून मदतीची हाक मारली आहे.
पूनमने हॅकिंगच्या विरूध्द मुंबई बांद्राच्या गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली आहे. पूनमचे वकिल प्रशांत मल्लीने आमच्यासोबत बोलताना सांगितले, 'पूनमची वेबसाइड सोमवारी संध्याकाळी पाकिस्तान झिंदाबादने हॅकने केली आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅक्ट 2000च्या कलम 66च्या अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. वेबसाइड हॅकरच्या विरूध्द गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस लवकरात-लवकर करावाई करतील.'