आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्याच मालिकेमुळे एकताचा चित्रपट तोट्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘शादी के साइड इफेक्ट्स’ चित्रपटावर बालाजी टेलिफिल्म्सच्या ‘जोधा अकबर’ मालिकेचा प्रभाव पडला आहे. श्री करण सेना नावाच्या संघटनेने राजस्थानमध्ये बर्‍याच ठिकाणी चित्रपट प्रदर्शित होऊ दिला नाही.
‘जोधा अकबर’ मालिकेची सुरुवातीपासूनच निर्माती एकता कपूरवर वक्रदृष्टी आहे. अलीकडेच या डेली सोपपासून वेगळे झालेल्या एकताला आता विरोधाचा सामना करावा लागत आहे. श्री करण सेनेने शुक्रवारी एकताच्या प्रॉडक्शन हाऊसच्या ‘शादी के साइड इफेक्ट्स’ला राजस्थानमध्ये बर्‍याच ठिकाणी प्रदर्शित होऊ दिले नाही. संपूर्ण राज्याच्या 80 चित्रपटगृहांत प्रदर्शित होणारा हा चित्रपट फक्त 14 चित्रपटगृहांत लागला, तोदेखील दुपारी 3 वाजेच्या शोनंतर.
राजस्थानच्या वितरकांनी चित्रपट सव्वा कोटीमध्ये विकत घेतला होता. मात्र, गुरुवारी रात्रीपासूनच राजपूत समाजाच्या संघटनेने विरोध केल्यामुळे वितरकांनी चित्रपट न लावण्याचा निर्णय घेतला. बालाजी फिल्म्सलादेखील कळवण्यात आले. एकताचा मामा आणि बालाजीचे डिस्ट्रिब्युशन हेड रमेश सिप्पी यांनी विरोध करणार्‍या संघटनेशी चर्चा केली. एकता त्या मालिकेपासून वेगळी झाल्याची गोष्ट ते लोक मानायला तयार नव्हते. संस्थेच्या लोकांनुसार फक्त दाखवण्यासाठी असे बोलले जात आहे.
समाजाच्या लोकांनी मालिका बंद करण्याची नव्हे, तर त्याचे नाव बदलण्याची अट ठेवली आहे. स्थानिक चित्रपटगृहांचे मालक विरोध असल्यामुळे चित्रपट प्रदर्शित करणार नाहीत, हे समजताच रमेश सिप्पी यांनी नॅशनल मल्टिप्लेक्सवर दबाव टाकला. त्यांनी वारंवर समजावून सांगितल्यावरच आयनॉक्स, सिनेपोलिस आणि पीव्हीआर यांनी चित्रपट प्रदर्शित केला. एकताचा मागील चित्रपट ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबईन 2’ देखील वाद झाल्यामुळे तोट्यात राहिला होता.