आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शादी के साइड इफेक्ट्स'च्या स्क्रिनिंगला पोहोचले सेलेब्स, विद्या-फरहानने मारली दांडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फरहान अख्तर आणि विद्या बालन यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'शादी के साइड इफेक्ट्स' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग 25 फेब्रुवारी रोजी मुंबईत ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला जावेद अख्तर, शबाना आझमी, दिया मिर्झा आणि दिव्या दत्तासह बरेच सेलेब्स पोहोचले होते. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे विद्या आणि फरहानने आपल्या या सिनेमाच्या पहिल्याच स्क्रिनिंगला दांडी मारली होती. हे दोघे स्क्रिनिंगला का अनुपस्थित होते, हे अद्याप कळू शकलेले नाही.
असो, 'शादी के साइड इफेक्ट्स' हा सिनेमा 2006मध्ये रिलीज झालेल्या 'प्यार के साइड इफेक्ट्स' या सिनेमाचा सिक्वेल आहे. फरहान आणि विद्यासह राम कपूर, वीर दास आणि गौतमी कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत. साकेत चौधरी दिग्दर्शित हा सिनेमा शोभा आणि एकता कपूर यांची निर्मिती आहे. प्रीतमने या सिनेमा संगीतबद्ध केले आहे. येत्या 28 फेब्रुवारी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...