आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फारुख शेख, शबाना आजमी यांचे ताजमहलमध्‍ये फुलले होते प्रेम, वाचा अधुरी एक प्रेम कहाणी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा : 'तुम्‍हारी अमृता' या नाटकादरम्‍यान शेख फारुख आणि शबाना आझमी यांनी जुल्‍फी आणि अमृता यांची भूमिका केली होती. प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरलेल्‍या नाटकांमध्‍ये या नाट‍काचा समावेश होईल. नाटकामधील गोष्‍ट लखनऊ, अलिगढ, मुंबई, पॅरिस, तर कधी न्‍यूयार्क अशी फिरत राहते. कथानकातील अमृता प्रेम प्राप्‍त करु शकत नाही आणि प्रेमापासून विलगही होऊ शकत नाही.

आग्रा शहरातील लोकांना 'तुम्‍हारी अमृता' या नाटकाची वेगळी अनुभूती त्‍यावेळी पाहायला मिळाली. या नाटकाचे दिग्‍दर्शन फिरोज अब्‍बास खान यांनी केले होते. त्‍यांनी सांगितले की, हे अ‍मेरिकी नाटक भारतीय संस्‍कृतीच्‍या ढंगात जावेद सिद्दिकी यांनी लिहिले आहे.

जुल्‍फी पहिल्‍या प्रेमपत्रामध्‍ये अमृताला 'परियोंकी शहजादी' अशी उपाधी देतो. आणि तेथूनच प्रेमाला सुरुवात होते. संपूर्ण प्रेमप्रकरण हे प्रेमपत्रावर आधारित आहे. भारत पाकीस्‍तानच्‍या फाळणीवेळी जुल्‍फीला पाकीस्‍तानमध्‍ये जावेसे वाटते. परंतु अमृता त्‍याला विरोध दर्शविते. त्‍याचदरम्‍यान त्‍याचे प्रेमप्रकरण विस्‍‍कटते. जुल्‍फी यांचे लग्‍न दुस-या महिलेशी होते. अमृताचेही लग्‍न पॅरिसच्‍या एंडी नामक व्‍यक्‍तीशी होते. परंतु तिचा संसार जास्‍त काळ टिकत नाही. ती लखनऊमध्‍ये परत येते. इकडे जुल्‍फी वकील बनतो. त्‍याचबरोबर राजकारणात प्रवेश करतो. काही काळांनी अमृताच्‍या प्रेमाच्‍या आठवणीत आकंठ डुंबून जातो. अमृता त्‍याला लग्नाविषयी बोलते, परंतु राजकारणाचे कारण सांगून तो नकार देतो. त्‍यादरम्‍यान यांची प्रेमपत्रे एका पत्रकारास सापडतात. तो एकप्रकारे जुफ्लीला प्रेमपत्रावरुन ब्‍लॅकमेल करण्‍याचा प्रयत्‍न करातो. तेव्‍हा जुल्‍फी अमृताला लग्‍नाच्‍या प्रस्‍ताव कळवतो. हे सर्व पत्रांद्वारेच झालेले असते. शेवटी अमृता जेव्‍हा जुल्‍फीचे मुलं आणि पत्‍नी पाहते, तेव्‍हा ती लग्‍नाला नकार देते. आणि आत्‍महत्‍या करते.
शबाना आझमी आणि फारुख शेख यांनी आपल्‍या भूमिकेच्‍या माध्‍यमातून हे नाटक अजरामर केले आहे. या कार्यक्रमाच्‍या उद्घाटनासाठी राजा अरिंदम सिंह उपस्थित होते. त्‍याचबरोबर हरविजय सिंह बाहिया, अशोक जैन उपस्थित होते. त्‍यावेळी त्‍यांनी फारुख शेख, शबाना आझमी अ‍ाणि फिराज खान यांचा सत्‍कारही केला होता.

पुढील स्‍लाइडवर पहा, नाटकातील अप्रतिम छायाचित्रे...