आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan And Suhana Support Gauri In Her New Venture 'The Design Cell'

शाहरुखची पत्नी गौरीने दाखवली आपल्या नवीन स्टोअरची झलक, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नेहमी चर्चा एकवटणारा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आता त्याची पत्नी गौरी खानमुळे चर्चेत आला आहे. गौरी लवकरच आपले नवे इंटिरियर डिझाइनर स्टोअर उघडणार आहे. याचे नाव 'द डिझाइन सेल' ठेवण्यात आले आहे. याविषयी शाहरुख म्हणाला, ''गौरीला तिच्या करिअरमध्ये असे पुढे जाताना बघून मला आनंद होतोय. तिला डिझाइन आणि डेकोरेशनचे उत्तम ज्ञान आहे. तिचे नवीन स्टोअर नक्की यशोशिखरावर पोहोचेल, अशी मला आशा आहे.''
गौरीने जवळच्या मित्रांना आपल्या नवीन स्टोअरची झलक बघण्यासाठी बोलावले होते. याविषयी ती म्हणाली, ''मी काहीतरी हटके करावे, अशी शाहरुखची इच्छा आहे. त्यामुळे मी या नवीन स्टोअरचा विचार केला.''
गौरीच्या या नवीन स्टोअरमध्ये तिची मुलगी सुहाना आणि फराह खान दिसल्या.
दिग्दर्शक करण जोहरने शाहरुख आणि गौरीचे वरील छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. ऋतिकपासून विभक्त झालेली
सुझान रोशनसुद्धा अशाच एका स्टोअरची संचालिका आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा गौरी खानच्या नवीन स्टोअरची झलक...