आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखने वाईमध्ये आणली उटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खान काहीही करू शकतो हे त्याने सिद्ध करून दाखवले. सध्या तो रोहित शेट्टीच्या ‘चैन्नई एक्स्प्रेस’मध्ये काम करत आहे. चित्रपटातील काही दृश्यासाठी रोहितने तमिलनाडूमधील उटीला जाण्याचा विचार केला होता. मात्र, शाहरुखला मुंबईपासून दूर जाणे पसंत नव्हते. मुंबईपासून वाई काहीच अंतरावर आहे. त्यामुळे तो शूटिंग झाल्यावर मुंबईला जाऊ शकतो. मात्र, उटीला गेल्यावर शूटिंग पूर्ण होईपर्यंत तो मुंबईला परत येऊ शकला नसता. म्हणून त्याने वाईमध्येच उटीसारखे लोकेशन करण्याचे ठरवले. रोहितला कळल्यावर त्याने शाहरुखला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसआरकेने ऐकले नाही.

खरं तर शाहरुखला हा चित्रपट ईदला प्रदर्शित करायचा आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर चित्रपटाची शूटिंग पूर्ण करू इच्छित आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकाची भेट रेल्वेमध्ये होते. त्यानंतर ते उटीमध्ये भेटतात. त्यामुळे तेथे दृश्य शूट करायचे होते. इतक्या दूर जाऊन शूटिंग करण्याऐवजी वाई पाचगणीमध्येच शाहरुखने उटी बनवण्याचे ठरवले. तसा सेट बनवण्याला शाहरुखला 40 दिवस आणि 1.5 कोटी खर्च आला. प्रत्येक बारीक गोष्टीचा सेटमध्ये विचार करण्यात आला. कला दिग्दर्शक नरेंद्र राहुरीकर यांनी हा सेट तयार केला. ते म्हणतात की, सुरुवातीला खूप अवघड वाटणारे काम आता पूर्ण झाले आहे. दक्षिणेकडील हिल स्टेशन येथे बनवणे अशक्य होते. मात्र, मी ते करून दाखवले. पाचगणीत एक छोटेसे गाव आम्ही तयार केले आहे. मात्र त्याला पूर्णपणे उटी म्हणता येणार नाही.