आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Gets Teary Eyed While Watching Documentary On KKR

KKRवर बनवलेली डॉक्युमेंट्री बघून शाहरुखचे डोळे पाणावले, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी dainikbhaskar.comने वाचकांना सांगितले होते, की बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खानची आयपीएल टीम कोलकाता नाइटराइडर्सवर एक डॉक्युमेंट्रीची निर्मिती केली जात आहे. या डॉक्युमेंट्रीची शुटिंग पूर्ण झाली असून आता एडिटींगचे काम सध्या सुरू आहे. काल (20 फेब्रुवारी) दिवशी शाहरुख खानला या डॉक्युमेंट्रीचे काही फुटेज दाखवण्यात आले. हा कार्यक्रम डिस्कव्हरी चॅनलच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कारण डिस्कव्हरी चॅनलच शाहरुखच्या टीमवर डॉक्युमेंट्री बनवत आहे. आपल्या आयुष्यात विजय किती महत्वाचा असतो, हा संदेश या प्रोजेक्टच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
डॉक्युमेंट्रीचे फुटेज बघून शाहरुखच्या डोळ्यात पाणी आले आणि तो भावूक झाला होता. शाहरुखची ही टीम आयपीएलची ही टीम मागील चार मालिकांमध्ये फ्लॉप ठरली आहे. ही टीम सेमीफाइनलमध्ये जागा बनवण्यासाठीसुध्दा अपयशी ठरली होती. परंतु 2012मध्ये या टीमने दमदार कमबॅक केले होते. त्यावर्षी केकेआरने चेन्नई सुपरकिंग्सचा पराभव करून चॅम्पिअनशिपचा पुरस्कार जिंकला होता.
या शाहरुखच्या टीमच्या या सर्व गोष्टी खूपच अप्रतिमरित्या मांडल्या आहेत. त्यामुळे शाहरुख भावूक झाला होता आणि अचानक त्याच्या डोळ्यातून पाणी आले. केकेआरवर बनवलेली ही डॉक्युमेंट्री डिस्कव्हरी चॅनलवर 24 ते 27 फेब्रुवारीपर्यंत प्रसारित केली जाणारा आहे. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, की काल झालेल्या या कार्यक्रमाची काही छायाचित्रे आणि शाहरुख कसा झाला भावूक...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कशाप्रकारे सर्वांसमोर भावूक झाला शाहरुख