आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Performs In Lungi; Jacqueline, Madhuri Dixit In Gown At Temptations Reloaded.

न्यूझिलंडमध्ये माधुरी, जॅकलीन, राणीचा जलवा, शाहरुखच्या परफॉर्मन्सवर चाहते फिदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्म इंडस्ट्रीत अभिनेता शाहरुख खान एवढा बिझी स्टार्स कदाचित कुणी दुसरा असेल. 'चेन्नई एक्स्प्रेस'चे यश साजरे केल्यानंतर शाहरुख आता वेगवेगळ्या देशांत लाईव्ह कॉन्सर्ट करण्यात बिझी आहे. टेंपटेशन रीलोडेड या नावाने शाहरुख बॉलिवूडच्या तारकांबरोबर परदेशात लाईव्ह कॉन्सर्ट करतोय. ऑक्लँडपासून सुरु झालेला हा शो न्यूझिलंडपर्यंत पोहोचला आहे.
शाहरुखबरोबर या कॉन्सर्टमध्ये जॅकलिन फर्नांडिस, माधुरी दीक्षित आणि राणी मुखर्जी सहभागी झाल्या आहेत. न्यूझिलंडमध्ये पार पडलेल्या या कॉन्सर्टमध्ये राणी हिरव्या रंगाच्या लहेंगा-चोलीत मंचावर अवतरली, तर जॅकलिन परीच्या रुपात समोर आली. या दोन्ही अभिनेत्रींनी शाहरुखबरोबर डान्स परफॉर्मन्स दिला.
तर डान्सिंग क्वीन माधुरी दीक्षित 'आगरे से घाघरा...' या गाण्यावर थिरकली. माधुरीने लाल आणि हिरव्या रंगाची लहेंगाचोली परिधान केली होती. यानंतर माधुरी शाहरुख खानबरोबर परफॉ‍र्म करण्यासाठी व्हाईट गाऊनमध्ये प्रेक्षकांसमोर आली.
बॉलिवूडच्या या बड्या स्टार्सबरोबर रॅपर हनी सिंगसुद्धा परदेशातील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा या इवेंटची खास झलक...