आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Starrer Fan Postponed Owing To Injury?

दुखापतीमुळे अटकले सिनेमाचे शुटिंग, आता पुढच्या वर्षी येणार शाहरुखचा \'FAN\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हॅप्पी न्यू इअर'च्या सेटवर जखमी झाल्यानंतर शाहरुख खानने सिनेमाची शुटिंग सध्या थांबवली आहे. परंतु तो आराम करण्याऐवजी शहर भम्रंती करत आहे. अलीकडेच त्याने हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांच्या मुलीच्या लग्नात हजेरी लावली आणि मुंबईला परतल्यानंतर काही खास दिग्दर्शकांची भेट घेतली. त्याने काही सिनेमांच्या पटकथेवर बातचीत केली आणि काही महत्वाचे निर्णयसुध्दा घेतले आहेत.
त्याचा 'हॅप्पी न्यू इअर' दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार हे निश्चित आहे. परंतु जखमी झाल्यानंतर त्याच्या 'फॅन' या सिनेमाचे वेळापत्रक कोलमडले आहे. आता यशराज बॅनरखाली बनवण्यात आलेल्या या सिनेमाचे प्रदर्शन प्रभावी ठरणार आहे. सिनेमाचे हक्क विकण्यात आणि मार्केटचा अर्थ समजण्यात कुशल असलेल्या शाहरुख खानने 'फॅन' सिनेमासाठी नवीन निर्णय घेतला आहे. आता हा सिनेमा जानेवारी 2015मध्ये रिलीज करण्यात येणार आहे.
असे नाही, की नवीन वर्ष 'फॅन' सिनेमाने सुरू होणार आहे. हा सिनेमा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे सिनेमाला चार आठवड्याचा कालावधी मिळेल. 23 जानेवारी 2015ला रिलीज झाल्यानंतर 26 जानेवारीचा दिवससुध्दा या सिनेमाच्या खात्यात येणार आहे.
'चेन्नई एक्स्प्रेस'च्या रिलीजवेळी शाहरुखवर शस्त्रक्रिया झाली होती, परंतु तरीदेखील त्याने उत्सहाने सिनेमाचा प्रचार केला होता. 'फॅन'च्या बाबतीत त्याचा निर्णय इंडस्ट्रीत सध्या चर्चेत आहे. आमिर मार्केटिंगच्या राजकारणात कुशल आहे तर शाहरुखकडे सिनेमाचे हक्क विकण्याचे आणि मार्केटचा अर्थ समजण्याचे कौशल्य आहे.