आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Tops Forbes India Celebrity 100 List

शाहरुखने मारली बाजी, देशातील टॉप-100 सेलिब्रिटींमध्ये ठरला अव्वल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोर्ब्स नियतकालिकाने पहिल्यांदाच तयार केलेल्या देशातील टॉप-100 सेलिब्रिटींच्या यादीत शाहरुख खानला अव्वल स्थान मिळाले आहे. दुस-या स्थानावर सलमान खान व तिस-या स्थानावर महेंद्रसिंग धोनी आहे. फोर्ब्सने ही यादी सेलिब्रिटींचे उत्पन्न व लोकप्रियतेच्या आधारावर तयार केली आहे.

फोर्ब्सच्या यादीनुसार 1 ऑक्टोबर 2011 ते 30 सप्टेंबर 2012 दरम्यान शाहरुखने 202.8 कोटी रुपयांची कमाई केली. याच दरम्यान सलमान आणि धोनीने क्रमश: 144.2 व 135.16 कोटींची कमाई केली आहे. यादीमध्ये टॉप-५ मध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांची नावे आहेत.

यादीमध्ये सायना नेहवाल, विराट कोहली, अनुष्का शर्मा, आणि सानिया मिर्झा यासारख्या 12 तरुणांना टॉप-50 सेलिब्रिटींमध्ये स्थान देण्यात आले आहे. यामध्ये सायना नेहवाल सर्वात कमी वयाची सेलिब्रेटी ठरली आहे. टॉप-100 सेलिब्रिटींची ही यादी 'फोर्ब्स इंडिया'च्या पुढील अंकामध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. 28 जानेवारी 2013 मध्ये हे नियतकालिक बाजारात दाखल होईल.