आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Undergoes Fresh Tests; His Right Shoulder Is Fractured!

शाहरुखच्या उजव्या खांद्याचे हाड मोडले, 21 दिवस घ्यावी लागणार शुटिंगपासून सुटी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख 23 जानेवारी रोजी आपल्या आगामी सिनेमाच्या शुटिंगदरम्यान जखमी झाल्याची बातमी आहे. फराह खान दिग्दर्शित 'हॅपी न्यू इयर' या सिनेमातील गाण्याची शुटिंग मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु होते. त्यावेळी शाहरुखच्या हाताला आणि चेह-याला दुखापत झाली. उपचारासाठी त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारांनंतर शाहरुखला रुग्णालयातू सुटी देण्यात आली आणि तो पुन्हा शुटिंग सेटवर परतला. मात्र शाहरुख पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याच्या उजव्या खांद्याचे हाड मोडले आहे.
शाहरुखच्या प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, ''शाहरुख खानच्या काही नव्याने तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये त्याच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर डावा टोंगळासुद्धा दुखापतग्रस्त झाला आहे. डॉक्टरांच्या मते, त्याला पुढील दोन ते तीन आठवडे आरामाची गरज आहे.''
शुटिंगदरम्यान शाहरुख कसा झाला दुखापतग्रस्त आणि सलमानने कशी उडवली त्याची खिल्ली, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...