आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Wants To Keep Son Aryan Away From His Third Child?

थोरला मुलगा आर्यनला तिस-या बाळापासून दूर ठेऊ इच्छितोय शाहरुख ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा तिसरा मुलगा येत्या जुलै महिन्यात या जगात येणार हे आता स्पष्ट झाले आहे. आत्तापर्यंत शाहरुखच्या या मुलाबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. याविषयी अनेक प्रश्नही उपस्थित केले गेले होते. शाहरुखचे हे बाळ सरोगेट असणार आहे. अर्थातच या बाळाला शाहरुखची पत्नी गौरी खान जन्म देणार नाहीये. तर सरोगेट मदरच्या माध्यमातून हे बाळ जन्माला येणार आहे.

आता यावर शाहरुखचा 16 वर्षीय मुलगा आर्यन आणि 13 वर्षीय मुलगी सुहाना यांची काय प्रतिक्रिया असणार ? शिवाय गेल्या काही महिन्यांपासून शाहरुखचा मुलगा आर्यन लंडनमध्ये का आहे ? आर्यनचे लंडनला शिकायला जाणे आणि शाहरुखच्या तिस-या बाळाच्या जन्माचे प्लानिंग एकत्र सुरु होणे हा केवळ योगायोग आहे का ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

आर्यनला उच्च शिक्षण घेण्यासाठी शाहरुखने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लंडनला पाठवले होते. त्यानंतर शाहरुख आणि गौरीने सप्टेंबर-ऑक्टोबर 2012 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून आपल्या तिस-या बाळाबद्दल प्लानिंग केले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या संपूर्ण प्रकरणाविषयी...