आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shah Rukh Khan’S Son Abram Showered With Baby Gifts From Kajol

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SRKच्या सरोगेट बाळाचे काजोलने पुरवले लाड, बघा किती घनिष्ट आहे दोघांची मैत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुखच्या घरी काही दिवसांपूर्वीच नवीन पाहुण्याचे आगमन झाले. आम्ही बोलतोय ते शाहरुखच्या तिस-या बाळाविषयी. शाहरुखला त्याच्या तिस-या बाळाच्या आगमनासाठी बॉलिवूडमधून शुभेच्छा मिळाल्या नाहीत. मात्र काजोल त्याला अपवाद ठरली आहे.

तसे पाहता शाहरुख खान आणि काजोलची जोडी ब-याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर दिसली नाही. मात्र या दोघांची मैत्री पूर्वी इतकीच घनिष्ट आहे. याचे ताजे उदाहरण अलीकडेच बघायला मिळाले. काजोलने शाहरुखला त्याच्या तिस-या बाळाच्या जन्मासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. शिवाय तिने शाहरुखच्या 'मन्नत'वर एक बेबी बास्केट पाठवली. यामध्ये बाळाच्या उपयोगाच्या खास वस्तू होत्या.

काजोलच्या निकटवर्तीयाने दिलेल्या माहितीनुसार, काजोलने 1 ऑगस्ट रोजी शाहरुखच्या घरी काही भेटवस्तू पाठवल्या. काजोल शाहरुख आणि गौरीसाठी खूप आनंदीत असून तिने त्यांना शुभेच्छा दिल्या.

तसे पाहता शाहरुख आणि काजोलचा पती अजय देवगण यांच्यात खूप चांगले संबंध नसल्याच्या बातम्या आहेत. मात्र तरीदेखील काजोल आणि शाहरुखच्या मैत्रीवर याचा परिणाम झालेला नाहीये.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये बघा शाहरुख-काजोलच्या मैत्रीची झलक..