आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगाच आला शाहरुखच्या घरात, परंतु सरोगेट आईचे रहस्य कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या तिसर्‍या मुलामुळे उठलेल्या अफांवर पूर्णविराम लागण्याचे चिन्ह दिसत आहेत. एका वर्तमानपत्राने छापलेल्या बातमीनुसार शाहरुख आणि गौरीने सरोगसीच्या माध्यमातून तिसर्‍या मुलाला जन्म दिला आहे. बृहनमुंबई महानगर पालिके(बीएमसी)च्या अधिकार्‍यांना एका मुलाचा जन्माचा दाखला मिळाला आहे. यानुसार मे महिन्यातील २७ तारखेला जन्मेलेल्या मुलाच्या दाखल्यावर पालक म्हणून शाहरुख आणि गौरीचे नाव आहे. बीएमसीचे आरोग्य अधिकारी डॉ. अरुण बामणे यांनी दिलेल्या माहितीनुसार ३४ आठवड्यांच्या प्रेग्नंसीनंतर अंधेरीच्या मसरानी हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या या मुलाचे वजन दीड किलोग्रॅम होते.

सांगण्यात येत आहे की, या मुलाला मसरानी हॉस्पिटलमधून जुहू येथील नानावटी हॉस्पिटलमध्ये आणि त्यांनंतर परत ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मुलाला ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमधूनच डिस्‍चार्ज देण्यात आला,जो आता किंग खानच्या 'मन्नत' बंगल्यात आहे.

‘शाहरुखला सरोगसीच्या माध्यमातून तिसर्‍यांदा होणारे बाळ मुलगा आहे’, असे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले होते. या वृत्तानंतर न जन्मलेल्या बाळाचे लिंग समजले कसे?, असा सवालही गर्भलिंग चाचणीविरोधात काम करणार्‍या संघटनेने केला होता.