आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहीद-इलिनाचे प्रेमप्रकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बर्फी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी इलिना डिक्रूज आपल्या प्रेमप्रकरणामुळे चर्चेत असते. 'बर्फी' चित्रपटात रणबीरसोबत रोमान्स करणारी इलिना आता शाहीद कपूरसोबत दिसणार आहे. दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या आगामी चित्रपटात इलिना आणि शाहीद कपूर रोमान्स करताना दिसणार आहेत. हा एक बॉलिवूड मसाला चित्रपट आहे. याचे नाव सध्या 'फटा पोस्टर निकला हीरो' असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाचे निर्माता रमेश तोरानी आहेत. इलिना बुद्धिमान आणि सुंदर असल्यामुळे तिची या चित्रपटासाठी निवड झाल्याचे तोरानी यांनी सांगितले. चित्रपटाचे कथानक 'ओरिजनल' आहे आणि हा चित्रपट कोणत्याच चित्रपटाचा रिमेक नसल्याचे त्यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल आणि पुढच्या वर्षी चित्रपट पडद्यावर येणार असल्याचे संतोषी यांनी सांगितले.
कथित पत्नीमुळे शाहीद झाला हैराण, घेतली पोलिसांची मदत
इम्तियाज अलीच्या सिनेमात शाहीद-कतरिनाची जोडी
शाहरुखबरोबर मैत्री वाढवण्यासाठी शाहीद झाला प्रियंकापासून दूर !
प्रियांकाच्या प्रेमात शाहीद झाला शायर (व्हिडिओ)