बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभय देओल मुंबईच्या बांद्रा परिसरातील 'ओलिवे बार अॅण्ड किचन'च्या बाहेर दिसले होते. तिथे त्यांना बघून चाहत्यांनी त्यांच्या भोवती गर्दी केली. यावेळी काही छायाचित्रकारांनीही दोघांच्या अनेक झलक कॅमे-यात कैद केल्या. दोघांच्या बॉडीगार्डने चाहत्यांच्या गर्दीतून त्यांना गाडीपर्यंत सुरक्षित पोहोचवले.
शाहिद जेव्हा बारच्या बाहेर आला तेव्हा त्याचा नवीन लूक खूपच आकर्षक दिसत होता. त्याची दाढी वाढलेली आणि डोक्यावर केस नव्हते म्हणजेच टक्कल होते. त्याने टक्कल लपवण्यासाठी काळ्या रंगाची हॅट डोक्यावर घातलेली होती. शाहिद सध्या त्याच्या 'हैदर' या सिनेमात व्यस्त आहे. त्याच्या या नवीन लूकला बघितल्यानंतर सिनेमाचे रहस्य काही प्रमाणात उघड झाले आहे, की शाहिदचा सिनेमात कसा लूक असणार आहे.
शाहिदने काळ्या रंगाची हॅट, जीन्स आणि टी-शर्टसुध्दा काळ्या रंगाचाच परिधान केलेला होता. त्याने हातात काळ्या रंगाची घड्याळ आणि शुजदेखील काळ्या रंगाचेच घातलेले होते. अभय देओल निळ्या रंगाची जीन्स, पांढ-या रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी रंगाच्या नेहरू कटमध्ये दिसला. शाहिदने काही दिवसांपूर्वी टि्वटरवर पोस्ट केले होते, 'हैदरच्या शेवटच्या वेळापत्रकातील सीन वाचत आहे. थोडा उदास आणि उत्साहीसुध्दा आहे. मागील चार दिवसांपासून माझ्या केसांमध्ये हात फिरवत आहे. बर्फ पडणे बंद झाले आहे आणि आता काश्मिरला जायचे आहे.'
हॉटेलच्या बाहेर शाहिदचा नवीन लूक कसा दिसला बघाण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...