आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद म्हणतो, 'मला एका सुपरहिट सिनेमाची गरज'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉक्स ऑफिसचा व्यवसाय पाहून सिनेमाचे मूल्यमापन केले जाते, शिवाय एका चांगल्या अभिनेत्याचेदेखील मूल्यमापन केले जाते, हे अत्यंत चुकीचे असल्याचे अभिनेता शाहिद कपूर एका कार्यक्रमात म्हणाला आहे. शुक्रवारी 6 डिसेंबर रोजी त्याचा ‘र..राजकुमार’ प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाकडून त्याला खूप अपेक्षा आहेत. शाहिदचे मागील बरेच सिनेमे अपयशी ठरले आहेत.
शाहिदच्या ‘इश्क विश्क’ (2003), ‘विवाह’ (2006) आणि ‘जब वी मेट’ (2007) या सिनेमांना चांगले यश मिळाले होते. मात्र ‘कमीने’, ‘चुपके-चुपके’ आणि ‘मौसम’ या सिनेमांनी कमाई केली नाही, पण त्याच्या कामाचे कौतुक नक्की झाले होते. त्यामुळे आता प्रभुदेवाच्या दिग्दर्शनात बनलेल्या र..राजकुमारदेखील यशस्वी व्हावा अशी त्याची इच्छा आहे. यामुळे त्याच्या डळमळीत करिअरची गाडी रुळावर येऊ शकते. यानंतर तो विशाल भारद्वाजच्या 'हैदर'मध्येदेखील दिसणार आहे.
सध्या माझा वाईट काळ सुरू आहे. त्यामुळे जीवनाच्या या वळणावर मला यश मिळवायचे आहे. नशीबाने साथ दिली तर सिेनेमा नक्कीच यशस्वी होईल, असे शाहिद म्हणतो.