आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पप्पा संजय दत्तच्या पावलावर पाऊल ठेवतोय छोटा शाहरान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जैसा बाप वैसा बेटा' अशी हिंदीतील म्हण आहे. संजय दत्तच्या लाखो फॅन्सप्रमाणेच त्याचा मुलगा शाहरानसुद्धा त्याचा मोठा फॅन आहे. तसे पाहता संजय दत्तची मुले शाहरान आणि इकरा अजून खूप लहान आहेत. मात्र शाहरान नेहमीच संजय दत्तला घरी ड्रम्स वाजवताना बघतो.

संजय दत्तला म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्सची आवड आहे. त्याचा मुलगा शाहरान त्याला नेहमीच घरी गिटार आणि ड्रम्स वाजवताना बघतो. आता आपले वडिल संजय दत्तच्या पावलावर पाऊल ठेवत शाहरानचीसुद्धा म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्स आवड निर्माण झाली आहे.

सध्या संजय दत्त राजकुमार हिराणीच्या आगामी 'पीके' सिनेमाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने राजस्थानमध्ये आहे. संजयला सरप्राईज देण्यासाठी मान्यता दत्त लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या दोन्ही मुलांबरोबर मांडव्याला पोहोचली.

यावेळी संजय दत्त आणि मान्यता दत्त ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेथे एक स्पेशल पपेट शो आयोजित करण्यात आला होता. नेहमी आपल्या वडिलांना ड्रम्स वाजवताना बघणारा शाहरान संधी मिळताच स्टेजवर पोहोचला आणि कॉगो ड्रम्स वाजवला. हे बघून संजय आणि मान्यतासह तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी शाहरानचे तोंडभरुन कौतूक केले.

एक नजर टाकुया ड्रम्स वाजवणा-या शाहरानच्या खास छायाचित्रांवर...