आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrugate Baby? Cheeky Amul Takes A Dig At Shahrukh Khan!

SHAHRUGATE BABY ? अमूलने उडवली शाहरुखची खिल्ली !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमूल ब्रॅण्ड नेहमीपासून आपल्या मजेशीर जाहिरातींसाठी चर्चेत असतो. चर्चेत असलेल्या जवळपास सगळ्याच विषयावर अमूल ब्रॅण्ड मजेशीर कार्टून जाहिरात तयार करतो. या जाहिरातींचे सगळीकडे कौतुकही केले जाते. मात्र काहीवेळा अमूलच्या जाहिरातींनी वादालाही तोंड फोडल्याची उदाहरणे आहेत. मात्र अशा वादांमुळे या ब्रॅण्डची लोकप्रियता तीळमात्रही कमी झालेली नाही.

सध्या शाहरुख खानच्या सरोगेट बाळाची बरीच चर्चा होत आहे. सरोगेसीच्या माध्यमातून शाहरुख खान तिस-यांदा बाबा होणार आहे. जुलै महिन्यात शाहरुखचे बाळ जन्माला येणार आहे. सध्याच्या या हॉट टॉपिकवर अमूलने कार्टून जाहिरात तयार केली नसेल तरच नवलं.

अमूलने रंजक पद्धतीने शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाचे कार्टून बनवले आहे. या कार्टूनमध्ये शाहरुखच्या सरोगेट बेबीला 'शाहरुगेट बेबी' असे नाव देण्यात आले आहे.

अद्याप शाहरुखने याविषयावर आपली प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. मात्र जाहिरात विश्वाला या रुपात एक चांगला विषय मिळाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.