आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहरुखच्या शानदार ईद पार्टीत जमले संपूर्ण बॉलिवूड, बघा EXCLUSIVE छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसांपूर्वी ईदच्या मुहूर्तावर शाहरुख खानचा 'चेन्नई एक्स्प्रेस' हा सिनेमा रिलीज झाला. 'चेन्नई एक्स्प्रेस'ने रिलीजच्या एक दिवसआधीच पेड प्रीव्ह्यूमधून सात कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर सिनेमाला मिळत असलेला चांगला रिस्पॉन्स बघून शाहरुख खूप आनंदात आहे. हा आनंद त्याने ईदच्या दिवशी एक जंगी पार्टी देऊन सेलिब्रेट केला. या पार्टीत शाहरुखचे फिल्म इंडस्ट्रीतील सर्व मित्र आले होते.

विशेष म्हणजे ईदच्या दिवशी शाहरुखने मीडियासाठीसुद्धा एक वेगळी पार्टी आयोजित केली होती. ही पार्टी दुपारच्या वेळेत झाली. यावेळी शाहरुखच्या संपूर्ण कुटुंबाने मीडियासमोर छायाचित्रे काढली. शाहरुखसाठी ईद सेलिब्रेशनचे दुहेरी कारण होते. एक म्हणजे त्याच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर दुसरे कारण म्हणजे त्याच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले. शाहरुखचे तिसरे बाळ अबरामची ही पहिलीच ईद आहे. तसे पाहता यावेळी शाहरुख आणि गौरीने अबरामला मीडियासमोर आणण्याचे टाळले. मात्र सुहाना आणि आर्यन यावेळी त्यांच्याबरोबर दिसले होते.

मीडियानंतर शाहरुखने त्याच्या फिल्म इंडस्ट्रीतील मित्रांसाठी रात्री एक जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला संपूर्ण बॉलिवूड अवतरलं होतं.

मन्नतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शाहरुखच्या ईद पार्टीत सहभागी झालेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...