आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shahrukh And Hritik At Janmashtami Dahi Handi Festival

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहिहंडीच्या मस्तीत रंगले स्टार्स, ऋतिक-शाहरुखने लावले ठुमके, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गोकुळाष्टमीच्या निमित्ताने गुरुवारी सर्वत्र दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. 'चेन्नई एक्स्प्रेस'च्या यशामुळे आनंदात असलेल्या शाहरुख खानने गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या दहिहंडीच्या कार्यक्रमाला विविध ठिकाणी उपस्थिती लावली. या कार्यक्रमांत शाहरुखने 'चेन्नई एक्स्प्रेस'च्या गाण्यांवर ताल धरला. शाहरुख दुपारपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झाला.
मनसे आमदार राम कदम यांच्या घाटकोपर येथील कार्यक्रमात शाहरुख सहभागी झाला. त्यानंतर संध्याकाळी मुंबईतील वरळी येथील सचिन भाऊ अहिर यांच्या दहिहंडी कार्यक्रमात पोहोचला. यावेळी कॉमेडियन कपिल शर्मासुद्धा हजर होता.
शाहरुखबरोबरच बॉलिवूडमधील जितेंद्र, महिमा चौधरी, प्रेम चोप्रा, ऋतिक रोशनसह बरेच सेलेब्स दहिहंडी कार्यक्रमात सहभागी झाले होते.
दहिहंडी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...