आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh, Deepika, Abhishek, Amisha Celebrates Party With Multiple Stars

शाहरुख, दीपिका, अभिषेक, अमिषासह अनेक स्टार्सनी पार्टीत लावली हजेरी, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड बादशाह शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण सध्या त्यांच्या 'हॅप्पी न्यू इअर' या सिनेमामध्ये व्यस्त आहेत. या व्यस्त वेळेतून वेळ काढून किंग खान गोविंदा नामदेव यांची मुलगी मेघाच्या रिसेप्शनमध्ये गेले होते. तसेच, दुस-या दिवशी किंग खान मुंबईच्या जे. डब्लू. मॅरिअटमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातदेखील सामील झाला होता. या कार्यक्रमात बॉलिवूडच्या अनेक स्टार्सची झलक बघायला मिळाली. या कार्यक्रमामध्ये दीपिका पदुकोण तिच्या जवळचा मित्र रणवीर सिंहसोबत दिसली.
दीपिका आणि रणवीरला बी-टाऊनची सर्वात फॅशनेबल जोडी मानले जाते. दोघे त्यांच्या चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतात. यावेळीही ते हटक्या अंदाजात दिसले. रणवीरने नवीन हेअरस्टाइल करून डोळ्यांवर मोठा चश्मा लावला होता. दीपिकाही एकदम बदलल्या लूकमध्ये दिसली. तिने निळ्या रंगाचा पोल्का डॉटेड ड्रेस परिधान केला होता. परंतु सोनम कपूरने तिच्या लूकने दीपिकाला मात्र टक्कर दिली. ती या कार्यक्रमात खूपच हॉट दिसत होती.
'क्वीन'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त कंगणा राणावतसुध्दा या कार्यक्रमात पोहोचली होती. अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. त्यांच्यासोबत अभिषेक बच्चनदेखील कार्यक्रमात आला होता. या सर्वांसोबतच, राकेश रोशन, जितेंद्र, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, शरमन जोशी, अनिल कपूर, कैलाश खेर, कंगणा राणावत, माही गिल, अनुपम खेर, अमिषा पटेल, फराह खान, प्रिती झिंटा यांसारखे मोठे स्टार्ससुध्दा या कार्यक्रमात पोहोचले होते. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसुध्दा या कार्यक्रमात हजेरी लावण्यास आला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा या कार्यक्रमात बॉलिवूडचे कोण-कोणत्या स्टार्सनी हजेरी लावली...?