आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Gives A Surprise Birthday Party For Rohit Shetty

PHOTOS : रोहितबरोबर वाढली शाहरुखची मैत्री, दिली सरप्राईज पार्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी टाऊनमध्ये कधी कुणाचा मित्र आणि कधी शत्रु होईल याचा नेम नसतो. आता हेच बघा ना अभिनेता-दिग्दर्शक म्हणून अजय देवगण-रोहित शेट्टी आणि शाहरुख खान-करण जोहर यांची मैत्री बी टाऊनमध्ये प्रसिद्ध आहे. मात्र आता चित्र जरा वेगळे झाले आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीची मैत्री आता शाहरुख खानबरोबर वाढली आहे.

रोहितने आपल्या जवळपास सगळ्याच सिनेमांमध्ये अजय देवगणला कास्ट केले होते. मात्र आपल्या आगामी 'चेन्नई एक्सप्रेस' या सिनेमात रोहितने अजयला डच्चू देत शाहरुखची वर्णी लावली. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान शाहरुख आणि रोहितचे बाँडिंग चांगले जुळले आहे. या दोघांची मैत्रीही वाढत आहे आणि म्हणूनच शाहरुखने आपल्या या नव्या मित्रासाठी एक सरप्राईज पार्टी आयोजित केली होती.

अलीकडेच रोहित शेट्टीचा वाढदिवस झाला. रोहितला स्वतःचा वाढदिवस साजरा करणे आवडत नाही. ही गोष्ट शाहरुखला कळताच त्याने सिनेमाच्या टीमबरोबर रोहितच्या सरप्राईज पार्टीचे प्लानिंग केले. या पार्टीत दीपिका पदुकोणबरोबर सिनेमाची टीम आणि रोहितचे कुटुंबीय हजर होते.

विशेष म्हणजे शाहरुखने आपल्या या मित्राला त्याच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून एक हार्डी बाईक दिली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा शाहरुखने दिलेल्या सरप्राईज पार्टीची खास झलक...