आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

F'DAY SPL : ही दोस्ती तुटायची नाय...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडच्या नायकांमध्ये फक्त स्पर्धाच असते, असे बोलले जाते. मात्र ऋतिक रोशन, शाहरुख खानची मैत्री याला अपवाद आहे. शाहरुख आणि ऋतिक फार चांगले मित्र आहेत. शिवाय या दोघांच्या पत्नीही चांगल्या मैत्रीणी आहेत. ऋतिकच्या 'क्रिश 3' या चित्रपटात किंग खान मदत करायला तयार झाला आहे. खरे तर ऋतिक रोशन यांनी या चित्रपटासाठी किंग खानला नकारात्मक भूमिका ऑफर केली होती, मात्र काही कारणांमुळे शाहरुखने ती भूमिका नाकारली. पण चित्रपटाला हवी ती मदक करण्याचे वचन त्याने रोशन कुटुंबाला दिले होते. आता शाहरुखने आपला तो शब्द पाळला आहे. शाहरुखने 'क्रिश 3' च्या शुटिंगसाठी आपला पर्सनल स्टुडिओ सेटअप रोशन यांना दिला आहे. राकेश रोशन यांच्या मते, शाहरुखचा स्टुडिओ परदेशातल्या स्टुडिओप्रमाणे आहे.
याला म्हणतात मैत्री. शाहरुखने यावर्षी फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने ऋतिकला ही छानशी भेटच दिली आहे, असेच म्हणायला हवे.
F'Day SPL : सिनेमांमध्येसुद्धा 'हर एक फ्रेंड जरुरी होता है' !
F'DAY SPL : यारो दोस्ती बडी ही हसीन है...