आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोळखी लग्नात काही कोटींसाठी किंग खान आणि कतरिनाने लावले ठुमके, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बी टाऊनचे सेलिब्रिटी नेहमीच एखाद्या कार्यक्रमात किंवा एखाद्या दिग्गज व्यक्तिच्या लग्नसोहळ्यात ठुमके लावत असल्याचे तुम्हाला ठाऊकच असेल. बी टाऊनचे बडे स्टार्स हाय प्रोफाईल वेडिंगमध्ये ताल धरुन लाखो रुपयांची कमाई करत असतात. सिनेमांच्या व्यतिरिक्त या कामातूनही या स्टार्सची लाखोंची तर कधी कोटींची कमाई होत असते.

राजकारणी, मोठे व्यावसायिक या स्टार्सना आपल्या खासगी कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमंत्रित करत असतात. सुपरस्टार शाहरुख खान या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. आता कतरिना कैफसुद्धा या यादीत सामील झाली आहे.

अलीकडेच लंडनमध्ये झालेल्या एका हायप्रोफाईल लग्नात शाहरुख आणि कतरिनाने परफॉर्म केले. दोघांनी आपल्या नृत्याने पाहुण्यांचे मनोरंजन केले आणि लग्नाची शोभा वाढवली. या दोघांच्या परफॉर्मन्सची काही छायाचित्रे समोर आली आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा शाहरुख-कतरिनाची ही खास छायाचित्रे...