आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LIVE PICS: 'मन्नत'मध्ये अशी साजरी होतेय शाहरुख-गौरीची ईद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाची ईद शाहरुखसाठी दुहेरी आनंद घेऊन आली आहे. ईदच्या मुहूर्तावर शाहरुखचा 'चेन्नई एक्स्प्रेस' हा सिनेमा रिलीज झाला आहे. याशिवाय शाहरुखचा तीन महिन्यांचा मुलगा अबरामची ही पहिलीच ईद आहे. 'चेन्नई एक्स्प्रेस' रिलीजआधीच सुसाट पळाली आहे. या सिनेमाचा रिलीजपूर्वी पेड प्रीव्ह्यू आयोजित करण्यात आला होता. शाहरुखच्या या सिनेमाच्या पेड प्रीव्ह्यूने सात कोटींची कमाई केली आहे. यासोबत या सिनेमाने आमिर खानच्या 'थ्री इडियट्स'च्या पेड प्रीव्ह्यूचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
एवढ्या आनंदात ईद नक्कीच मोठ्या जल्लोषात साजरी केली जाणार, हे काही वेगळं सांगायला नको. यानिमित्ताने शाहरुखच्या मन्नतला फुलांनी सजवण्यात आले असून येथे शानदार पार्टीसुद्धा आयोजित करण्यात आली आहे.
शाहरुखने ईदच्या मुहूर्तावर आपल्या घरी एक पत्रकार परिषद आयोजित करुन मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा ईदच्या दिवशी क्लिक झालेली शाहरुखची त्याच्या कुटुंबीयांबरोबरची खास छायाचित्रे...