आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan Cover Page Of Filmfare Magazine Launch

शाहरुखने केले फिल्मफेअरचे कव्हरपेज लाँच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सध्या खूप खुशीत आहे. अहो, त्याचे कारणही तसेच आहे. आयपीएल 6मध्ये त्याची टीम चांगले प्रदर्शन करत आहे. लवकरच त्याचा 'चेन्नई एक्सप्रेस'ही लवकरच रिलीज होणार आहे. याशिवाय आणखी एका कारणामुळे शाहरुखच्या आनंदाला पारावर उरला नाहीये.

भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत फिल्मफेअर या प्रसिद्ध मॅगझिनने त्यांचे स्पेशल कव्हरपेज तयार केले आहे. या कव्हर पेजवर बॉलिवूडचे तीन दिग्गज एकत्र आले आहेत. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे तीन अभिनेते कव्हर पेजवर एकत्र आले आहेत. या स्पेशल अंकात भारतीय सिनेमांचा शंभर वर्षांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यामध्ये बेस्ट फिल्म, डायलॉग आणि गाण्यांबरोबर बरेच काही आहे. अलीकडेच शाहरुख खानने फिल्मफेअर मॅगझिनचा हा नवा अंक लाँच केला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या लाँचिंगची खास छायाचित्रे...