आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहरुखची मन्नतमध्ये कुटुंबीयांसह ईद साजरी, अबरामला ठेवले लोकांच्या नजरेपासून दूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


9 ऑगस्टला ईदच्या मुहूर्तावर शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'चेन्नई एक्स्प्रेस' हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने पहिल्याच दिवशी दणक्यात ओपनिंग करत सात कोटींची कमाई केली. 'चेन्नई एक्स्प्रेस'ला प्रेक्षकांचा मिळत असलेला चांगला प्रतिसाद बघून शाहरुख खूप आनंदात आहे. शाहरुखने ईदनिमित्त 'मन्नत'वर एक शानदार आयोजित केली होती. या पार्टीत त्याने मीडियालासुद्धा आमंत्रित केले होते.

या पार्टीत मीडियासमोर शाहरुखचे संपूर्ण कुंटुंबीय आले होते आणि त्यांनी फोटोग्राफर्सना पोज दिले. शाहरुखसाठी यंदाची ही ईद खूपच स्पेशल ठरली. शाहरुखची 'चेन्नई एक्स्प्रेस' बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटली आहे. तर काही दिवसांपूर्वीच शाहरुखच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. तिस-या बाळाच्या आगमनाचा आनंद शाहरुखच्या कुटुंबीयांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. यावेळी शाहरुख आणि गौरीने आपल्या तिस-या बाळाला मीडियासमोर आणले नाही. आर्यन आणि सुहाना मात्र यावेळी उपस्थित होते. शाहरुखच्या या पार्टीत दिग्दर्शक रोहित शेट्टी हजर होता. मात्र दीपिका पदुकोण या पार्टीत दिसली नाही.

मन्नतमध्ये आयोजित शाहरुखच्या ईद पार्टीची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...