आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan Fashion Blunder In Bhopal During Chennai Express Promotion

FASHION BLUNDER: दोन वर्षे जुन्या कपड्यांत भोपाळमध्ये पोहोचला शाहरुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान शुक्रवारी भोपाळमध्ये पोहोचला. आपल्या आगामी 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने शाहरुख भोपाळमध्ये आला. दुपारी 1.30च्या सुमारास भोपाळ एअरपोर्टवर त्याचे विमान लँड झाले.
व्हाईट शर्टवर हाफ ब्लॅक जॅकेट आणि ब्लू जिन्समध्ये शाहरुख यावेळी दिसला. यावेळी चाहत्यांनी त्याला गराडा घातला. शाहरुखनेही आपल्या चाहत्यांची निराशा न करता त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतले. शिवाय चाहत्यांना हात दाखवून अभिवादनही केले. विमानतळावरुन शाहरुख थेट प्रमोशनस्थळी पोहोचला आणि पुन्हा एकदा चाहत्यांची भेट घेतली.
दोन वर्षांपूर्वी शाहरुख 'रा वन' सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने भोपाळला आला होता. आता शाहरुख बॉलिवूडचा मोठा स्टार असला तरीदेखील त्याच्याही हातून चुक ही घडतेच. आता हेच बघा ना दोन वर्षांपूर्वी शाहरुख भोपाळमध्ये ज्या पेहरावात दिसला होता यावेळी देखील तो अगदी त्याच रुपात दिसला. आपल्या जुन्या ड्रेसिंग स्टाईलमुळे शाहरुख येथे फॅशन ब्लंडर करताना दिसला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा दोन वर्षांपूर्वी आणि आत्ताची शाहरुखची भोपाळ भेटीची छायाचित्रे...