आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुटिंगदरम्यान शाहरुखवर पडले 80 किलो वजनाचे दार, चेह-याला झाली दुखापत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता शाहरुख खान फराह खान दिग्दर्शित 'हॅप्पी न्यू इअर' या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान जखमी झाला आहे. शुटिंग दरम्यान दरवाजा आदळल्याने त्याच्या चेह-याला आणि हाताला इजा झाली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुहूतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सिनेमातील गाण्याचे शुटिंग सुरु होते. या गाण्याच्या शुटिंगदरम्यान शाहरुखला एक मोठा दार ढकलून एन्ट्री घ्यायची होती. हे दार जवळजवळ 80 किलो वजनाचे होते. हे दार शाहरुखवर आदळल्याने त्याच्या चेह-याला आणि हाताला दुखापत झाली. त्याला तातडीने नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.