‘रेड चिलीज’ या आपल्या निर्मिती कंपनीतून फराह खानच्या दिग्दर्शनात चित्रपट बनवत असलेला
शाहरुख खान यथेच्छ पैसे वसूल करण्याच्या तयारीत आहे. चित्रपटाचे अधिकार त्याने कोणत्याही स्टुडिओला विकले नाहीत. चित्रपट विक्रीसाठी त्याने 200 कोटी रुपये ही किंमत निश्चित केली आहे.
‘मैं हूं ना’आणि ‘ओम शांती ओम’ चित्रपटानंतर शाहरुख खान आणि फराह खान ही यशस्वी जोडी ‘हॅप्पी न्यू इअर’ चित्रपटातून पुनरागमन करत आहे. या वर्षात शाहरुख खानने चित्रपट व्यवसाय समजणारा अॅक्टर-निर्माता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळेच आतापर्यंत त्याने ‘हॅप्पी..’ चित्रपटाचे अधिकार कोणत्याच मोठय़ा कॉर्पोरेट स्टुडिओला विकले नाहीत.
या चित्रपटांत त्याने बराच पैसा गुंतवला आहे. तामिळ आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित झालेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाने हिंदी मध्ये 200 कोटीची कमाई केली होती. सूत्रांनुसार शाहरुखने ‘हॅप्पी..’ चित्रपटातून 200 कोटीचा नफा मिळविण्याचा निश्चय केला आहे. यामुळे चित्रपट स्टुडिओला या चित्रपटासाठी 225 कोटीपेक्षा जास्त पैसा द्यावा लागणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या या सिनेमाविषयी काय आहे शाहरुखची स्ट्रॅटेजी...