आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan Parties With Akshay Kumar,Poonam Pandey And Rakhi Sawant

किंग खानने राखी सावंत आणि पूनम पांडेबरोबर एन्जॉय केली पार्टी, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईत 25 सप्टेंबरच्या रात्री ब्राइट आऊटडोर मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सीएमडी योगेश लखानीची शानदार बर्थ डे पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत दिग्गजांनी हजेरी लावली होती.

शाहरुख खानपासून ते अक्षय कुमार, पूनम ढिल्लन, मोनिका बेदी, पूजा मिश्रा, शक्ति कपूर, डायना हेडन, अमृता राव, सोफी चौधरीसह बरेच सेलिब्रिटी या पार्टीत दिसले. किंगफिशर मॉडेल ते अभिनेत्री असा प्रवास करणारी पूनम पांडे आणि वादग्रस्त अभिनेत्री राखी सावंत यांचीही झलक यावेळी बघायला मिळाली. पूनमने बॅकलेस ड्रेसमध्ये पोज देऊन नेहमीप्रमाणे उपस्थितांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले.

या पार्टीत सहभागी होण्यापूर्वी शाहरुख खान त्याच रात्री अभिनेता चंकी पांडेच्या पार्टीतही दिसला होता. यावेळी त्याची पत्नी गौरीसुद्धा त्याच्याबरोबर दिसली होती. मात्र या पार्टीत शाहरुखसोबत गौरी दिसली नाही.

बघा या बर्थ डे बॅशची खास छायाचित्रे...