आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan Postponed Chennai Express Trailer Due To Priyanka Father Death

प्रियांकाच्या वडिलांच्या निधनामुळे शाहरुख दुःखी, घेतला हा महत्त्वाचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या वडिलांच्या निधनामुळे शाहरुख खानने आपल्या आगामी 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाचा ट्रेलर आत्ताच लाँच न करण्याचा निर्णय घेतला आहे.
होय, शाहरुख असे करुन आपली मैत्री निभावत आहे. प्रियांकाच्या वडिलांच्या निधनाचे वृत्त ऐकताच शाहरुख खान आजारी असतानाही तिला सांत्वन देण्यासाठी पोहोचला होता. शिवाय प्रियांकाचे वडील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल असताना शाहरुख त्यांची विचारपूस करायलाही गेला होता. सोमवारी डॉ. अशोक चोप्रा यांच्या अंत्यसंस्कारातही शाहरुख प्रियांकाबरोबर दिसला.
शाहरुख आपल्या बहुप्रतिक्षित 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाची आतुरतेने वाट बघतोय. 13 जून रोजी रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर लाँच होणार होता. मात्र आपली जवळची मैत्रीण आणि को-स्टार असलेल्या प्रियांकाच्या वडिलांच्या निधनामुळे शाहरुखने आता 'चेन्नई एक्स्प्रेस'ची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. याशिवाय शाहरुख येत्या 15 जूनला आपल्या फॅमिलीबरोबर लंडनला सुटी एन्जॉय करण्यासाठी जाणार होता. शाहरुखने आपली ही ट्रीपही रद्द केली आहे.
शाहरुख आणि प्रियांका चांगले मित्र असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे शाहरुख या दुःखद काळात प्रियांकाच्या पाठीशी उभा आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा प्रियांकाच्या वडिलांच्या शोकसभेची छायाचित्रे...