आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan Salman Khan Funny Pictures On Internet

PHOTOS:सोशल नेटवर्किंग साईट्सवर चाहत्यांनी अशी उडवली शाहरुख-सलमानची खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार बाबा सिद्दिकी यांनी रविवारी रात्री मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्समध्ये इफ्तार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली. आम्ही बोलतोय ते सलमान खान आणि शाहरुख खानच्या गळाभेटीविषयी. या पार्टीत सहभागी होण्यासाठी रात्री आठच्या सुमारास सलमानपाठोपाठ शाहरुख आला. सलमान स्वत:हून शाहरुखच्या जवळ उभा ठाकला. इतकेच नाही तर त्याची गळाभेटसुद्धा घेतली. बॉलिवूडमधील दोन शत्रू तब्बल पाच वर्षांनंतर एकत्र आले आणि सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरले.
या पार्टीत सलमान-शाहरुखसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. या दोघांमधला दुरावा दूर झाल्याचे बघून उपस्थितांच्या चेह-यावर हसू उमलले.
2008 साली कतरिनाच्या वाढदिवशी शाहरुख आणि सलमान यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये असलेले शत्रुत्व जगजाहिर आहे. इतक्या वर्षांनंतर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र एका ठिकाणी दिसले.
यादरम्यान सोशल नेटवर्किंग साईट्सवर या दोघांची खिल्ली उडवली गेली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा इंटरनेटवर शाहरुख-सलमानची कशी खिल्ली उडवली जाते...