आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: 34 आठवड्यांत जन्मला शाहरुखचा मुलगा, बघा जन्मदाखला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानच्या सरोगेट बाळाबद्दल गेल्या काही दिवसांपासून मीडियात अनेक बातम्या आल्या. शाहरुखच्या निकटवर्तीयाने आता खुलासा करत सांगितले, की शाहरुखच्या तिस-या अपत्याचा जन्म एक महिन्यापूर्वीच झाला आहे. 27 मे रोजी शाहरुख-गौरीचे हे बाळ जन्माला आले असून त्याला मन्नतवर आणण्यात आले आहे. आता स्वतः शाहरुखनेसुद्धा या बातमीला दुजोरा दिला आहे. divyamarathi.com ला शाहरुखच्या सरोगेट बाळाचा जन्मदाखला मिळाला आहे.

या जन्मदाखल्यानुसार, शाहरुखच्या बाळाचा जन्म 27 मे रोजी सकाळी 3.28 मिनिटांनी झाला होता. या दाखल्यावर आईवडिलांच्या नावाचा उल्लेख शाहरुख मीर ताज आणि गौरी शाहरुख खान असा आहे. शिवाय बाळाचा जन्म 34 आठवड्यांत झाला असून त्याचे वजन दीड किलोग्रॅम असल्याचेही नमुद करण्यात आले आहे.

बीएमसीचे आरोग्य अधिकारी डॉ. अरुण बामणे यांनी दिलेल्या माहितीनुसार 34 आठवड्यांच्या प्रेग्नंसीनंतर अंधेरीच्या मसरानी हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाला. मात्र बाळ अशक्त असल्यामुळे त्याला मसरानी हॉस्पिटलमधून जुहू येथील नानावटी हॉस्पिटलमध्ये आणि त्यांनंतर परत ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मुलाला ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमधूनच 1 जुलै रोजी डिस्‍चार्ज देण्यात आला, हे बाळ आता किंग खानच्या 'मन्नत' बंगल्यात आहे.


शाहरुखच्या बाळाचा जन्मदाखला बघण्यासाठी आणि सविस्तर बातमी वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...