आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खान उभारणार 'एसआरके' स्टुडिओ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या ट्रॉम्बेमधील एस्सेल स्टुडिओ शाहरुखने विकत घेतल्याची चर्चा आहे. शिवाय त्याच्या नूतनीकरणावरदेखील काम सुरू असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि अजय देवगण यांनीदेखील स्वत:चे स्टुडिओ बनवल्याची अफवा होती.
शाहरुख आता गुड ओल्ड ट्रेंड परत आणत आहे. कारण चेंबूरमध्ये साडे सहा एकर जमिनीवर लीजेंड राज कपूर यांचा ‘आर के स्टुडिओ’, बांद्रामध्ये मेहबूब खानचा ‘मेहबूब स्टुडिओ’, कमाल अमरोही यांचा जोगेश्वरीमध्ये बनलेला ‘कमलिस्तान स्टुडिओ’, परेलमध्ये व्ही. शांताराम यांचा ‘राजकमल स्टुडिओज’, बांद्रामध्ये देव आनंद यांचा ‘आनंद रेकॉर्डिंग स्टुडिओ’ होते. धर्मेंद्र यांनीदेखील 70च्या दशकात ‘सनी सुपर साउंड’ नावाने स्टुडिओचा पाया रचला होता.
दक्षिणेतील प्रत्येक मोठ्या कलावंतांचा स्वत:चा स्टुडिओ आहे. टी रामानायडू, रामोजीराव, एव्हीएम, एलव्ही प्रसाद आदी अनेक स्टुडिओ आहेत. आता शाहरुखचादेखील स्टुडिओ होत आहे.
एखाद्या फिल्मी कथेसारखीच शाहरुखचे आयुष्य आहे. दिल्लीतून आलेला हा स्ट्रगलर गेल्या 25 वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. आता पुढची पिढी शाहरुखच्या स्टुडिओच्या माध्यमातून शाहरुखला ओळखू शकेल. 11 वर्षांपूर्वी शाहरुखने व्हीएफएक्ससाठी ‘रेड चिलीज एंटरटेन्मेंट’ चा पाया रचला होता. अलीकडेच त्याच्या कंपनी बनवलेल्या ‘क्रिश-3’ चित्रपटाची जगभरात खूप चर्चा झाली.