आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DDLJ पासून चेन्नई एक्स्प्रेसपर्यंत, शाहरुखची ट्रेन फॅन्टसी आजही आहे कायम...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये शाहरुख खान आणि ट्रेन जणू काही एक दुसऱ्यांसाठी तयार झाले आहेत. चित्रपटाचे शुटिंग भारतात असो किंवा विदेशात ट्रेनसोबत असलेले त्याचे नाते अनेक चित्रपटांमध्ये सहज दिसून येते. ट्रेनमधील शुटिंग त्याचे चित्रपट हिट करण्याचा एक फंडा झाला आहे. तसाही शाहरुख या बाबींमध्ये बराच विश्वास ठेवतो. चलती का नाम गाडी या चित्रपटापासून सुरू झालेला त्याचा ट्रेन प्रवास आजही सुरू आहे. त्याला तर यासाठी केवळ एक कारण हवे. एखादे गाणे, एखाद्या फाईटिंगचे दृष्य किंवा एखादी लव्ह स्टोरी असेल तरी त्याला ट्रेनमध्ये दाखविले जाते.

DDLJ या चित्रपटात ट्रेनसोबत शाहरुखचा सीन त्याचा ट्रेडमार्क झाला. या चित्रपटात ट्रेनमध्ये बसल्यानंतर तो काजोलचा हात धरतो आणि तिला सोबत घेऊन जातो. हा केवळ या चित्रपटाचा नव्हे तर भारतीय चित्रपटसृष्टीचा स्मरणात राहणारा सीन आहे.

यानंतर मलाईका अरोरा खानसोबत ट्रेनवर छैंय्या छैंय्या गाणे चित्रित करण्यात आले. मैं हू ना या चित्रपटाच्या पोस्टरवर शाहरुख ट्रेनरच दाखविण्यात आला. त्यामुळे असे म्हणता येऊ शकते, की शाहरुख ट्रेन कधी मिस नाही करू शकत नाही. अवघे बॉलिवूड खासगी विमाने आणि हेलिकॉफ्टर्समध्ये फिरत असताना किंग खान मात्र ट्रेन प्रवासालाच पसंती देतो.

पुढील स्लाईड्समध्ये बघा शाहरुख खानचे ट्रेनप्रति असलेले अविट प्रेम...