आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमा भरल्या जातात - शाहरुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खांद्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर शाहरुखने शूटिंग बाजूला ठेवत आराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ‘मन्नत’वर त्याच्या मित्रांसोबतच चाहत्यांचीही रीघ लागली आहे. शाहरुखने शूटिंगला दूर ठेवले असले तरी सोशल नेटवर्किंग साइटवर तो व्यग्र आहे. अलीकडेच आपल्या मायक्रोब्लॉगिंग साइटवर त्याने म्हटले आहे की ‘जखम भरून निघणे याचा अर्थ असा नाही की काही झालेच नव्हते. ती भरून निघण्याचा खरा अर्थ हा आहे की जखम आपल्याला आयुष्यभर दुखी ठेवू शकत नाही. काही वेळाने का होईना या जखमा भरतातच’.
आता शाहरुखने ही भावना खांद्याच्या शस्त्रक्रियेविषयी व्यक्त केली असली तरी अनेक जण त्याचा संबंध जुन्या प्रेमसंबंधांशी जोडत आहेत.