आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखने घेतली सलमानची जागा, ईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार सिनेमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने आता सलमान खानसारखेच आपले सिनेमे ईदच्या मुहूर्तावर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान खान बहूधा त्याचे सिनेमे ईदच्या मुहूर्तावर रिलीज करतो आणि ते सुपरहिट ठरतात. मागील वर्षी सलमान खानचा कोणताच सिनेमा रिलीज झाला नाही. ज्याचा शाहरुखनने चांगला फायदा घेतला कारण त्याने 'चेन्नई एक्स्प्रेस' सिनेमा ईदच्या दिवशी रिलीज करून कोटींची कमाई केली.
'चेन्नई एक्स्प्रेस'ने बॉक्स ऑफिसवर 227 कोटींची कमाई केली होती. सलमान खान यावर्षी त्याचा 'किक' हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर रिलीज करणार आहे. म्हणून शाहरुख खान यावर्षी त्याचा कोणताच सिनेमा ईदच्या मुहूर्तावर रिलीज करू शकणार नाही. परंतु संधी फायदा उचलण्यासाठी शाहरुख त्याचा 'रईस' हा आगामी सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज करण्याच्या विचारात आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक राहूल ढोलकिया 'रईस' सिनेमाचे दिग्दर्शन करणरा आहे. या सिनेमासाठी शाहरुख खान आणि फरहान अख्तर यानी गुंतवणूक केली आहे. सिनेमाची निर्मिती एक्सल इंटरटेनमेंट बॅनरमध्ये रितेश सिव्दवानी आणि फरहान अख्तर करणार आहे. सिनेमात शाहरुख डॉन आणि फरहान पोलिसाची भूमिका साकारणार आहे. सिनेमाची कहानी गुजरातच्या पृष्ठभूमिवर आधारित असणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बॉलिवूडच्या आणखी काही मोठ्या घडामोडी...