आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जन्नतपेक्षा कमी नाहीये शाहरुखचा 'मन्नत', बघा आलिशान घराची खास झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड इंडस्ट्रीचा सुपरस्टार शाहरुख खान गेल्या 20 वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करत आहे. या 20 वर्षांच्या काळात शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी पसंत केले. एवढ्या वर्षांच्या प्रवासात शाहरुखने पैशाबरोबरच नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे.

शाहरुखचा जन्म दिल्लीत झाला. तो सोळा वर्षांचा असताना कॅन्सरमुळे त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला मोठा धक्का बसला. शाहरुखची आई सतत आजारी राहू लागली आणि तो जेव्हा 25 वर्षांचा झाला तेव्हा, त्याच्या आईनेसुद्धा या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर मोठ्या कष्टाने शाहरुखने हे स्थान प्राप्त केले.

तसे पाहता बादशाह हा नेहमी बादशाहच असतो, मग तो घरात असो किंवा बाहेर. त्यामुळे बॉलिवूडच्या या बादशाहने आपल्या घराला 'मन्नत'ला 'जन्नत'चे रुप दिले आहे.

बॉलिवूडमध्ये आलिशान घराविषयीची चर्चाच मुळात शाहरुख खानच्या मन्नतपासून होते. शाहरुखने कोट्यवधी रुपये खर्च करून 'मन्नत' नावाचा बंगला बांधला आहे. त्याची भव्यदिव्यता अगदी डोळ्यांत भरणारी आहे.

शाहरुखच्या या बंगल्यामध्ये स्लायलिश इंटेरिअर, मोठे गार्डन, विदेशी फर्निचर आणि इतरही अत्याधुनिक सुविधा आहेत.
अलीकडेच शाहरुखने आपल्या 'मन्नत'वरच 'चेन्नई एक्स्प्रेस'चा प्रीमिअर आयोजित केला होता. या प्रीमिअरला शाहरुखचे जवळचे मित्र सहभागी झाले होते.

या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शाहरुखच्या 'मन्नत'ची सैर घडवत आहोत.