आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीडियापासून चेहरा लपवण्यामागे शाहरुखच्या मुलाचे नेमके कारण तरी काय ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा थोरला मुलगा आर्यन गुरुवारी मुंबई विमानतळावर दिसला. आर्यन काही महिन्यांपूर्वी उच्च शिक्षणासाठी लंडनला गेला होता. आता काही दिवसांसाठी तो मुंबईला परतला आहे. मात्र विमानतळावर आर्यन चक्क चेहरा लपवताना दिसला. आता यामागे नेमके कारण तरी काय ? असा प्रश्न कुणालाही पडणे स्वाभाविकच आहे.

झाले असे की, शाहरुख खान तिस-यांदा वडील होणार असल्याची बातमी आहे. सरोगेसीच्या माध्यमातून शाहरुखचे तिसरे बाळ जन्माला येणार आहे. हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी आर्यन अभ्यासातून ब्रेक घेत आपल्या कुटुंबीयांकडे परतला आहे. शाहरुख-गौरीने आपल्या बाळाच्या जन्मानंतर एक जंगी पार्टी आयोजित करण्याचे ठरवले आहे. या पार्टीत बी टाऊनमधील कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी होणार आहेत.

आता यासंदर्भात मीडियाने आर्यनला कोणतेही प्रश्न विचारु नये, म्हणून कदाचित त्याच्या आईवडिलानेच त्याला हा सल्ला दिलेला दिसतोय. म्हणून तर आर्यन चेहरा लपवत विमानतळाच्या बाहेर पडला.

बघा विमानतळावर क्लिक झालेली आर्यनची काही छायाचित्रे...