आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Promotes Chennai Express With Last Day Shooting Video

बघा, शाहरुख खानच्या चेन्नई एक्स्प्रेसचे काही खास सिन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शाहरुख खान केवळ नावात नव्हे तर कामातही सुपरस्टार आहे. त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटवरून ही बाब सिद्ध होते. आता तर त्याने सुपरस्टार बनण्याचे पाच मार्गही दाखवून दिले आहेत.

ईदला रिलिज होणारया चेन्नई एक्स्प्रेसच्या प्रमोशनसाठी शाहरुखने चित्रपट शुटिंगच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ एका सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला आहे. यापूर्वी रोहित शेट्टी आणि दीपिका पदुकोन यांनीही आपला व्हिडिओ ट्टिरवर शेअर केला होता.

शाहरुखला आपल्या चाहत्यांना सांगायचे आहे, की चित्रपटाचे शुटिंग अतिशय आनंदात पार पडले. चित्रपट बघताना प्रेक्षकांनाही असाच आनंद मिळणार आहे. चित्रपट रिलिज होण्यापूर्वी त्याच्या रिलिजचे फोटो आणि व्हिडिओ जाहीर व्हायला हवेत. त्यासाठी सोशल मीडिया एक चांगले व्यासपिठ आहे.

पुढील स्लाईड्सवर बघा चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटाचे काही अनकट सिन्स.