आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खान करणार अनुरागच्या 'एल्विन कालिचरण'मध्ये काम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुराग कश्यप दिग्दर्शित 'एल्विन कालिचरण' 2015 चा सर्वात धडाकेबाज सिनेमा ठरणार आहे. तथापि, शाहरुख यात काम करणार असल्याबाबत त्याच्याकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही, परंतु सूत्रांच्या मते, तो या सिनेमाची स्क्रिप्ट आपल्या रेड चिलीज बॅनरप्रमाणे करण्यासाठी अनुराग आणि त्याची कंपनी फँटम फिल्म्सच्या संपर्कात आहे.
सिनेमा सृष्टीतील कलावंत सिनेमांमध्ये आपापल्या पद्धतीने प्रमुख भूमिका साकारतात. तुम्ही मला नायक म्हणत असाल तर मी 25 वर्षांपासून फक्त तीच भूमिका साकारत आहे. मात्र, आता मला पात्र साकारायचे आहे. त्यामुळे मी वेगळ्या प्रकारच्या पटकथांचे वाचन करत आहे.
'डॉन-2' च्या प्रदर्शनादरम्यान डिसेंबर 2011 मध्ये शाहरुखने दैनिक भास्करशी बोलताना पहिल्यांदाच अनुराग कश्यपची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. सूत्रबद्ध सिनेमात काम करण्याबाबत प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, 'अनुरागचे सिनेमा मला आवडतात आणि मी त्याच्या संपर्कात आहे.' त्याचा इशारा एका प्रोजेक्टकडे होता. हा प्रोजेक्ट अनुरागसोबत करण्याची त्याची इच्छा होती. तो प्रोजेक्ट 'एल्विन कालिचरण' आहे. या सिनेमाचा विषयही 'देव डी' आणि 'ब्लॅक फ्रायडे' प्रमाणे ऑफबीट होता. एक दशकापूर्वी अनुरागने ही स्क्रिप्ट अनिल कपूरला केंद्रस्थानी ठेवून लिहिली होती.
प्रकरण असे होते की, निर्माता टुटू शर्माने आपली पत्नी पद्मिनी कोल्हापुरेची लहान बहीण तेजस्विनीला लाँच करण्यासाठी अनुरागचा पहिला सिनेमा 'पांच'मध्ये पैसा गुंतवला होता. याची कथा पुण्यातील 1976-77 मध्ये झालेल्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर आधारित होती. सिनेमाच्या निर्मितीदरम्यान अनुराग-टुटू यांच्यातील मैत्री वाढत गेली आणि 'एल्विन कालिचरण'ची स्क्रिप्ट लिहून सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली. मात्र, याच दरम्यान सेन्सॉर बोर्डाने 'पांच'चा विषय आणि अभद्र भाषा पाहता त्याच्या प्रदर्शनावर बंदी आणली.
सिनेमा आजपर्यंत प्रदर्शित होऊ शकला नाही. असे असले तरी अनुराग-टुटू यांची मैत्री कायम राहिली, परंतु 'एल्विन कालिचरण' वर त्याचा परिणाम झाला. आज अनुराग ब्रँड बनला आहे. त्याचे सिनेमा मल्टिप्लेक्सचे प्रेक्षक अधिक पसंत करतात. त्यामुळे तो शाहरुखला सिनेमात घेण्यासाठी धडपड करत आहे.
त्याच्या 'फँटम फिल्म्स' आणि 'एकेएफपीएल' सारख्या निर्मिती संस्थांमुळे त्याला निर्मात्याचा शोध घेण्याचीदेखील गरज नाही. शाहरुखनेही एखाद्या सिनेमात काम करण्याचे ठरवले तर तो 200 कोटी रुपयांपर्यंत मानधन घेण्याची क्षमता ठेवतो. जवळच्या सूत्रांच्या मते, हिरवा कंदील दाखवण्यास शाहरुख उशीर लावू शकतो, पण पुढच्या वर्षी या सिनेमाची शूटिंग सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
'एल्विन कालिचरण'ची कथा
या क्राइम थ्रिलरस सिनेमाची कथा एका काल्पनिक भविष्याभोवती केंद्रित आहे. तिथे अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यानंतर कोणतेच काम शिल्लक राहत नाही. सर्व कंपन्या आणि कॉर्पोरेट हाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शिल्लक राहतो तो फक्त करमणूक उद्योग.