आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यू-ट्यूब फॅन फेस्टमध्ये पोहोचला शाहरुख, वरुण-नर्गिसने लुटला कार्यक्रमाचा आनंद, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईमध्ये 1 मार्चला यू-ट्यूब फॅन फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. या फॅन फेस्टमध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची मुलगी सुहाना त्याच्यासोबत आली होती. किंग खान नेहमीसारखाच यावेळीही खूपच कूल अंदाजात दिसला. शाहरुख व्यतिरिक्त तिथे अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली. यू-ट्यूब चाहतेदेखील या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यू-ट्यूब फॅन फेस्टमध्ये पोहोचलेल्या बॉलिवूड स्टार्समध्ये वरुण धवन आणि नर्गिस फाखरी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. हे दोघेही त्यांच्या 'मै तेरा हीरो' या आगामी सिनेमाचे प्रमोशन करताना दिसले. 'मै तेरा हीरो' हा एक रोमँटिक आणि कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन डेविड धवनने केले आहे. 4 एप्रिल रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये झळकणार आहे. सिनेमा प्रमोट करत वरुण आणि नर्गिस यांनी या फॅन फेस्ट कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.
यू-ट्यूब फॅन फेस्टमध्ये पोहोचलेला शाहरुख खान सध्या 'हॅप्पी न्यू इअर'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा सिनेमा यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. शाहरुख व्यतिरिक्त या सिनेमात दीपिका पदुकोण, बोमन ईराणी आणि अभिषेक बच्चनसुध्दा आहे. सिनेमाचे दिग्दर्शन फराह खानने केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा यू-ट्यूब फॅन फेस्टमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची काही खास छायाचित्रे...