आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास बहलच्या आगामी सिनेमात शाहिद कपूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंगना रनोटचा 'क्वीन' शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. शिवाय दिग्दर्शक विकास बहल आपल्या आगामी सिनेमाची तयारी सुरू करत आहेत. 'शानदार' नावाचा सिनेमा डेस्टिनेशन वेडिंग या विषयावर आधारित आहे. या सिनेमात शाहिद कपूरची प्रमुख भूमिका राहणार असून शाहिदनेदेखील याला होकार दिला आहे. नुकतेच विशाल भारद्वाजच्या 'हैदर' सिनेमाचे शूटिंग पूर्ण करणार्‍या शाहिदचा हा पुढचा सिनेमा आहे. याबाबत त्याने मी लवकरच आपल्या आगामी सिनेमाची घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. हा सिनेमा त्यापैकीच एक आहे.
या सिनेमाची कथा लिहिण्यासाठी विकास बहलने अन्विता दत्त गुप्ताची मदत घेतली आहे. तो या सिनेमाचे संवाद आणि गाणी लिहिणार आहे. यापूर्वी अन्विताने 'मेरे डॅड की मारुती', 'स्टुडंट ऑफ द इयर' आणि 'तीस मार खां' या सिनेमांची गाणी लिहिली आहेत. शिवाय 'पटियाला हाऊस' आणि 'बचना ए हसींनो' या सिनेमांतील संवाददेखील लिहिले आहेत. 'शानदार' सिनेमाची शूटिंग तीन महिन्यांनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. शाहिदसोबत नायिकेच्या भूमिकेची निवड करणे अजून बाकी आहे.